समाजात सत्-असत् प्रवृत्ती एकत्रच वावरत असतात. असत् प्रवृत्तीचा प्रभाव वाढला की, मग चोर्या, दरोडे, भ्रष्टाचार, वासना यांचा सुळसुळाट होतो. या वृत्ती पराकोटीला पोचल्या की, मग त्यातून निष्पाप जीवांचा बळी अपरिहार्य ठरतो! समाजाप्रती आपली जबाबदारी फार महत्त्वाची आहे, या भावनेनं मग पोलीस यंत्रणा येनकेन प्रकारानं या गुन्ह्यांच्या मुळापर्यंत जाऊन, या पापवृत्तीला आळा घालण्यासाठी पुढे सरसावते. अखेर वत्प्रवृत्तीचाच विजय होतो.