Practical Geography-II (प्रात्यक्षिक भूगोल-२)

Chandrabhan Bhanudas Chaudhari Plot No-21, Borawake Nagar, Ward No-1, Shrirampur-413709 (MS, INDIA)
۴٫۸
۵ مرور
ای-کتاب
122
صفحه‌ها

درباره این ای-کتاب

प्रस्तुत ‘प्रात्यक्षिक भूगोल-२’ हे मराठी माध्यमातील पुस्तक बहुतांशी सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांच्या द्वितीय वर्ष कला वर्गाच्या द्वितीय  सत्राचा भूगोल स्पेशल विषयाचा अभ्यासक्रम (२०२०-२१) विचारात घेऊन लिहिलेलं आहे. या पुस्तकात बहुतांशी संकल्पना रंगीत छायाचित्र व आकृती स्वरुपात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे विविध संकल्पना समजण्यास मदत होईल असे वाटते. या पुस्तकाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक Power Point Presentation (४:३) आकारात आणि Portable Document Format (PDF) मध्ये तयार केलेले आहे. त्यामुळे शिक्षकांना शिकविण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

‘प्रात्यक्षिक भूगोल’ हा निरीक्षण व कौशल्याधीष्ठीत विषय आहे. २१ व्या शतकातील दूर संवेदन (Remote Sensing), भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System), जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (Global Positioning System) इ. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रात्यक्षिक भूगोलाच्या अभ्यासास अचूकता व गतिमानता प्राप्त झालेली आहे.

 ‘भूगोलशास्त्र (Geography)’ हा चार भिंतीबाहेर अनुभवातून शिकण्याचा विषय आहे. हा अनुभव घेण्यासाठी नकाशा मार्गदर्शक ठरतो. या नकाशाची निर्मिती केव्हा झाली? त्याचे मुलभूत घटक कोणते? नकाशाशी संबंधित शास्त्रास काय म्हणतात? नकाशात सांख्यिकी कोणत्या पध्दतीने दर्शवितात? सर्वेक्षण म्हणजे काय? सर्वेक्षणाचे प्रकार कोणते? नकाशात दिशा, अंतर, क्षेत्र कशा रीतीने मोजतात? अंतर व क्षेत्र मापन करण्याची एकके कोणती? क्षेत्र भेट म्हणजे काय? असे अनेक प्रश्न जिज्ञासा उत्पन्न करतात. अशा नकाशाशास्त्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरे निश्चितच या पुस्तकात आपणास मिळतील असे वाटते.


رتبه‌بندی‌ها و مرورها

۴٫۸
۵ مرور

درباره نویسنده

Professor & Head, Department of Geography, SSGM College, Kopargaon

رده‌بندی این کتاب الکترونیک

نظرات خود را به ما بگویید.

اطلاعات مطالعه

تلفن هوشمند و رایانه لوحی
برنامه «کتاب‌های Google Play» را برای Android و iPad/iPhone بارگیری کنید. به‌طور خودکار با حسابتان همگام‌سازی می‌شود و به شما امکان می‌دهد هر کجا که هستید به‌صورت آنلاین یا آفلاین بخوانید.
رایانه کیفی و رایانه
با استفاده از مرورگر وب رایانه‌تان می‌توانید به کتاب‌های صوتی خریداری‌شده در Google Play گوش دهید.
eReaderها و دستگاه‌های دیگر
برای خواندن در دستگاه‌های جوهر الکترونیکی مانند کتاب‌خوان‌های الکترونیکی Kobo، باید فایل مدنظرتان را بارگیری و به دستگاه منتقل کنید. برای انتقال فایل به کتاب‌خوان‌های الکترونیکی پشتیبانی‌شده، دستورالعمل‌های کامل مرکز راهنمایی را دنبال کنید.