नवरात्री भाग १० देवी सिद्धिदात्री: Navratri part 10 Devi Sidhidatri

· prafull achari
5.0
1 review
Ebook
28
Pages

About this ebook

'नवराञी' ह्या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल आचारी ह्यांनी अतिशय बारकाईने विचार करून पुस्तकाचे उपलेखक तसेच जुन्या रूढी परंपरेपासूनची माहिती संकलित करणारे सौ. विजया शरद आचारी, श्रीमती. लक्ष्मीबाई गुळस्करत्रिवेणी आचारी आणि उपलेखिका तसेच कवियत्री किरण गुळस्कर यांच्या मदतीने नवराञी म्हणजे नेमके काय? कशा पद्धतीने नवराञी उत्सव साजरा करावा? नवराञीतील नऊ देवी कोणत्या? त्यांची निर्मिती कशी झाली? अशा अनेक माहित नसलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची अतिशय उत्कृष्ट रित्या मांडणी करून त्याला थोडक्यात व सोप्या शब्दांमध्ये लेखणी करून ती आपल्या पर्यंत पोहचवली आहे.

      

ह्या पुस्तकाचे प्रफुल्ल ह्यांनी अकरा भागांमध्ये प्रकाशन करण्याचे योजिले आहे. वाचकांना सोयीस्कर होण्यासाठी तसेच थोडक्यात पण मुद्देसूद माहिती वाचकांना मिळावी हा हेतु लक्षात घेऊन त्यांनी अकरा वेगवेगळ्या भागांत प्रकाशन केले आहे.

        

नवराञीच्या पहिल्या भागामध्ये नवराञीचे महत्त्व, नवराञीच्या नऊ देवींची नावे, घटस्थापना कशी करावी, महत्त्वाचे देवीचे मंञ, आरत्या, जोगवा, रांगोळी ह्यांचा एकञीत संच वाचकांना वाचण्यास मिळतो. तसेच भाग दोन पासुन ते भाग दहा पर्यंत नऊ देवींचे नाव, व तसेच नावामागील कारणे, देवीचे रूप, त्या देवींची कहानी, प्रत्येक देवीचे विशिष्ट मंञ, कवच असे अनुक्रमे एक ते नऊ देवींचे वेगवेगळ्या भागांमध्ये मांडणी केली आहे.

नवराञीमध्ये खेळल्या जाणाऱ्या गरबाचे वैशिष्ट्य प्रफुल्ल ह्यांनी खुप छान सांगितले आहे. देवी भागवताचा सारांश असे ह्या पुस्तकाला म्हणायला काहीच हरकत नाही. नक्कीच वाचकांना हे पुस्तक खुप आवडेल आणि नवराञी बद्दलची माहिती सर्वांना भेटेल.


अकराव्या भागामध्ये भाग एक पासून ते भाग नऊ पर्यंतचा एकञीत संच वाचकांना वाचण्यासाठी भेटणार आहे. भाग एक ते दहा हे पूर्णपणे मोफत वाचण्यास मिळतील. परंतु भाग अकरावा हा काही मुबलक पैश्यात घ्यावा लागेल.


नवरात्री ह्या पुस्तकांचे प्रकाशन ह्या प्रमाणे होईल. २९ सप्टेंबरला भाग पहिला दुसरा आणि संपूर्ण भागांचा संच असलेल्या भाग अकरा हा प्रकाशित होईल. यानंतर ३० सप्टेंबरपासून रोज एक भाग याप्रमाणे दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ ला या नवरात्री पुस्तकाचा शेवटचा भाग दहावा प्रकाशित होऊन हे सर्व भाग समाप्त होतील. 



"प्रफुल्ल तु जे नवराञी हे पुस्तक लिहिले आहे. त्याबद्दल मला तुझा फार अभिमान वाटतो. कारण तु अनेक देवींची माहिती गोळा करुन त्यावर अभ्यास केलास. ते पुस्तक तु घटस्थापनेच्या दिवशी प्रकाशित करुन अनेकांना माहिती देणार आहेस. आदिशक्ती चे रुप आणि तीचे कार्य हि माहिती पुष्कळ जनांना माहित नाही.

नवराञी पुस्तकाच्या माध्यमातून ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचणार आहे. त्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. आजच्या पिढीतील मुलामुलींना मोबाइल, इंटरनेट मधून फुरसतच भेटत नाही. त्यामुळे देवी भागवत सारख्या अनेक वेदविद्येपासुन ते वंचित राहतात. अशा वातावरणात तु देवी भागवत पुराणावर अभ्यास करुन हे पुस्तक लिहिले आहे. ते अतिशय सुंदर आहे. तु अशीच प्रगती करत राहो ह्यासाठी तुला अनेक आशिर्वाद."

        

- लक्ष्मीबाई गुळस्कर (७३ वर्ष)

Ratings and reviews

5.0
1 review

About the author

प्रफुल्ल आचारी हे ‘ती आणि मी’ या मराठी पुस्तिकाचे सर्वोत्कृष्ट लेखक आहेत. 30 सप्टेंबर 2014 रोजी प्रकाशित झालेल्या विवाहित कादंबरीची पहिली प्रकाशित झाली आहे. दुसरी मराठी पुस्तक आवृत्ती 10 जानेवारी 2019 रोजी प्रकाशित झाली आहे.


इंग्रजी आवृत्तीचे शीर्षक "She & I" होते, जे 24 मे 2014 रोजी प्रकाशित झाले. या पुस्तिका च्या माध्यमातून, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक व्यक्ती आहे. तो तिच्यासाठी काहीही करण्याची इच्छा आहे. प्रफुल्ल म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रेमाच्या भावना त्यांना हव्या त्या प्रकारच्या घटना असतात. मनात विचारांचा एक रोमांचक प्रवास! त्याला ही पुस्तिका वाचायला मिळेल.

किरण गुळस्कर या दुरावा या काव्यसंग्रहच्या कवियत्री आहेत. तिच्या कवितेतल्या अनोख्या कवितेतून तिने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. किरण यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1994 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा येथील देवुलगाव राजा जिल्हा येथे झाला. तिचे वडील एका गावात जिल्हा परिषद शिक्षक होते. तो सध्या पुनर्वसित आहे. तिची आई घरी काम करते. छोटा भाऊ एमएमध्ये शिकत आहे. तर धाकटी बहीण बी.एस.सी. करत आहे.

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.