THE LAST DON

· MEHTA PUBLISHING HOUSE
5,0
1 მიმოხილვა
ელწიგნი
540
გვერდი

ამ ელწიგნის შესახებ

क्लेरिकुझिओ ही अमेरिकेतील सर्वांत प्रबळ अशी माफिया पॅâमिली. डॉन डॉमिनिको हा त्याचा प्रमुख असतो. जॉर्जिओ, व्हिन्सेंट, पीटी ही त्याची तीन मुलं आणि रोझमेरी ही त्याची मुलगी. पिप्पी हा त्याच्या दिवंगत बहिणीचा मुलगा. तो डॉनच्या पॅâमिलीसाठी सेनानी म्हणून काम करत असतो. सॅन्टाडिओ फॅमिलीचा अंत करण्यात पिप्पीने सिंहाचा वाटा उचललेला असतो. सॅन्टाडिओ पॅâमिलीने सिल्व्हिओ या डॉनच्या धाकट्या मुलाला ठार मारलेलं असतं. सॅन्टाडिओ पॅâमिलीतल्या जिमीवर रोझमेरीचं प्रेम बसतं. तिला त्याच्याशी लग्न करायचं असतं. अर्थातच डॉनचा याला विरोध असतो. सिाqल्व्हओच्या मृत्यूचा सूडही त्याला घ्यायचा असतो. तो रोझमेरीला जिमीशी लग्न करण्याची परवानगी देतो; पण लग्नाच्याच दिवशी पिप्पीच्या हस्ते जिमीसकट सगळ्या सॅन्टाडिओ पॅâमिलीचा अंत करतो. या कामात पिप्पीला डॉनच्या मुलांनीही मदत केलेली असते. रोझमेरीच्या डोळ्यांदेखत हे सगळं घडतं. त्यामुळे भावांविषयी, वडिलांविषयी आणि पिप्पीविषयी तिच्या मनात प्रचंड संताप असतो; वरवर ती शांत राहत असली तरी त्या संतापाचा उद्रेक झाल्यावर तिला वेडाचे झटके येत असतात. रोझेमेरी आणि जिमीचा मुलगा दान्ते आणि पिप्पी-नॅलिनचा मुलगा क्रॉस हे बरोबरीचे असतात. या दोघांच्या बाप्तिस्म्याच्या प्रसंगाने या कादंबरीची सुरुवात होते. 

       अथेना अॉqक्वटेन या अतिशय सुंदर आणि नामवंत अभिनेत्रीचं उपकथानक या कादंबरीत आहे. बॉझ स्वॅâनेट हा तिचा नवरा आणि बेथॅनी ही त्यांची मुलगी. अथेना बॉझपासून विभक्त झालेली असते; पण तरीही बॉझ वेगवेगळ्या प्रकारे तिचा छळ करत असतो. एकदा तर ती एका पंâक्शनला गेलेली असताना तो तिच्या तोंडावर अ‍ॅसिड (प्रत्यक्षात ते अ‍ॅसिड नसते) पेâकतो; पण त्या द्रवाचे काहीच थेंब तिच्या गालावर पडतात. या घटनेने अथेना मनातून पार हादरते़ लॉडस्टोन या हॉलिवुडमधील सगळ्यात मोठ्या स्टुडिओच्या ‘मेसालिना’ या बिग बजेट चित्रपटात ती काम करत असते; पण बॉझच्या हल्ल्यानंतर ती या चित्रपटातील काम थांबवण्याचा निर्णय घेते. अथेनाच्या या निर्णयामुळे लॉडस्टोन स्टुडिओची सगळी आर्थिक गणितं कोलमडणार असतात. त्यामुळे हरतNहेने अथेनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातो; पण ती ऐकत नाही. शेवटी या चित्रपटाची पटकथाकार असलेली क्लॉडिया हे प्रकरण घेऊन आपल्या भावाकडे-क्रॉसकडे जाते.

       क्रॉस लास व्हेगासमधल्या ‘झेनादू वॅâसिनो हॉटेल’चा भागीदार असतो. जुगारासाठी हे हॉटेल प्रसिद्ध असतं. अथेना आणि बॉझचं प्रकरण ऐकल्यानंतर ़क्रॉस ‘मेसालिना’ हा चित्रपट विकत घेतो. नंतर तो अथेनाचीही भेट घेतो. योजनाबद्ध रीतीने बॉझच्या खुनाची सुपारी क्रॉस त्याच्या एका विश्वासू सहकाNयाला देतो. तो सहकारी बॉझची हत्या करतो आणि बॉझने आत्महत्या केल्याचा बनाव रचतो. अर्थातच अथेनाचा ‘मेसालिना’मध्ये काम करण्याचा मार्ग मोकळा होतो. दरम्यान, क्रॉसच्या वडिलांचा, पिप्पीचा खून होतो. तो खून दान्तेनं केला आहे, असं क्रॉसला समजतं आणि दान्तेविषयी त्याच्या मनात सुडाची भावना निर्माण होते. क्रॉस आणि अथेना परस्परांच्या प्रेमात पडतात. अथेना एकदा क्रॉसला तिच्या मुलीकडे, बेथॅनीकडे घेऊन जाते. बेथॅनी ऑटिस्टिक असते. अथेनाने तिला उपचारांसाठी एका संस्थेत ठेवलेलं असतं. ‘मेसालिना’ पूर्ण झाल्यानंतर चित्रपटसंन्यास घेऊन उर्वरित जीवन बेथॅनीसाठी समर्पित करायचं अथेनाने ठरवलेलं असतं.

       ‘मेसालिना’ पूर्ण होतो आणि त्याच्या प्रिमिअरची पार्टी क्रॉस ‘झेनादू’मध्ये करायचं ठरवतो. त्या पार्टीसाठी त्याने दान्ते आणि जिम लाॉझीला (क्लेरिकुझिओ पॅâमिलीसाठी काम करणारा माजी पोलीस अधिकारी, ज्याचा पिप्पीच्या खुनात सहभाग असतो.) आमंत्रित केलेलं असतं. या पार्टीला ते दोघं आल्यानंतर त्यांचा काटा काढायचा, असं क्रॉसने ठरवलेलं असतं. त्या दोघांना मारून या माफियांच्या जगातून बाहेर पडायची आणि अथेनाबरोबर सभ्य, सुसंस्कृत जीवन व्यतीत करण्याची त्याची इच्छा असते; पण ‘मेसालिना’च्या पार्टीदरम्यान क्रॉसला ठार मारायची योजना दान्ते आणि जिमने आखलेली असते.

       दान्ते आणि जिमची योजना सफल होते का? की क्रॉसच त्यांना ठार मारतो, या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी ‘द लास्ट डॉन’ वाचलीच पाहिजे.

The Last Don is Domenico Clericuzio, a wise and ruthless old man who is determined to see his heirs established in legitimate society but whose vision is threatened when secrets from the family's past spark a vicious war between two blood cousins.

The Last Don is a mesmerizing tale that takes us inside the equally corrupt worlds of the mob, the movie industry, and the casinos where beautiful actresses and ruthless hitmen are ruled by lust and violence, where sleazy producers and greedy studio heads are drunk on power, where crooked cops and desperate gamblers play dangerous games of betrayal, and where one man controls them all.


შეფასებები და მიმოხილვები

5,0
1 მიმოხილვა

ავტორის შესახებ

Mario Gianluigi Puzo was an American author, screenwriter, and journalist. He is known for his crime novels about the Italian-American Mafia and Sicilian Mafia, most notably The Godfather, which he later co-adapted into a film trilogy directed by Francis Ford Coppola

შეაფასეთ ეს ელწიგნი

გვითხარით თქვენი აზრი.

ინფორმაცია წაკითხვასთან დაკავშირებით

სმარტფონები და ტაბლეტები
დააინსტალირეთ Google Play Books აპი Android და iPad/iPhone მოწყობილობებისთვის. ის ავტომატურად განახორციელებს სინქრონიზაციას თქვენს ანგარიშთან და საშუალებას მოგცემთ, წაიკითხოთ სასურველი კონტენტი ნებისმიერ ადგილას, როგორც ონლაინ, ისე ხაზგარეშე რეჟიმში.
ლეპტოპები და კომპიუტერები
Google Play-ში შეძენილი აუდიოწიგნების მოსმენა თქვენი კომპიუტერის ვებ-ბრაუზერის გამოყენებით შეგიძლიათ.
ელწამკითხველები და სხვა მოწყობილობები
ელექტრონული მელნის მოწყობილობებზე წასაკითხად, როგორიცაა Kobo eReaders, თქვენ უნდა ჩამოტვირთოთ ფაილი და გადაიტანოთ იგი თქვენს მოწყობილობაში. დახმარების ცენტრის დეტალური ინსტრუქციების მიხედვით გადაიტანეთ ფაილები მხარდაჭერილ ელწამკითხველებზე.