भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच्या संस्थानिकांच्या मानसिकतेचं चित्रण ही कादंबरी करते. त्या निमित्ताने त्या वेळचा संस्थानांचा कारभार, संस्थानिकाच्या पत्नीचं जीवन, संस्थानांमधील सामाजिक-सांस्कृतिक जीवन, तिथल्या चालीरीती, त्यांचा डामडौल इ. वर्णन या कादंबरीत येतं. दादा हे बेगवाड या छोट्याशा संस्थानाचे अधिपती. संस्थानिक असल्याचा अभिमान त्यांच्या नसानसांत भिनलेला असतो. त्यांचा मुलगा अभय लहानपणापासून संस्थानिक वातावरणात वाढलेला असतो. दादांचं आणि अभयचं वैवाहिक जीवन, त्यांची अंगवस्त्रं याच्या चित्रणातून संस्थानांमधील स्त्री-जीवन समोर येतं. हिंदुस्थानातून ब्रिटिशांची सत्ता हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना संस्थानांचं अस्तित्व राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण होतो आणि दादांमधला कट्टर संस्थानिक अस्वस्थ होतो. अभय मात्र होणार्या बदलांना सामोरा जायला तयार असतो. दादा हे बदल स्वीकारतात का? संस्थानांचं आणि संस्थानिकांचं प्रातिनिधिक, सर्वांगीण चित्रण करणारी कादंबरी.
MANOHAR MALGONKAR WAS AN EMINENT POST-INDEPENDENCE WRITER WHOM R.K. NARAYAN ONCE REFERRED TO AS HIS FAVOURITE INDIAN NOVELIST IN ENGLISH. HE WAS HAILED AS ONE OF INDIAS MOST EXUBERANT STORYTELLERS IN AN ARTICLE PUBLISHED BY THE NEW YORK TIMES IN 1965. BORN NEAR BELGAUM, MALGONKAR WAS THE GRANDSON OF THE PRIME MINISTER OF A FORMER PRINCELY STATE OF DEWAS. HE SERVED IN THE ARMY DURING WORLD WAR II, WAS A BIG-GAME HUNTER, A FARMER, A MINE OWNER AND AN ADVENTURER. LATER, HE STARTED WORKING AS A JOURNALIST AND THEREAFTER TOOK TO BOOK WRITING. HIS WORKS ARE AS DIVERSE AS HIS PERSONAL LIFE AND HAVE A BLEND OF HISTORY, ROMANCE AND MILITARY LIFE. SOME OF HIS MAJOR WORKS INCLUDE THE PRINCES, THE DEVILS WIND: NANA SAHEBS STORY AND THE SEA HAWK: LIFE AND BATTLES OF KANHOJI ANGREY.
मनोहर माळगांवकर (१९१३-२०१०) हे स्वातंत्र्योत्तर काळातील प्रख्यात लेखक होते. आर.के. नारायण यांनी माळगांवकर यांचा उल्लेख माझे इंग्रजीतील आवडते भारतीय कादंबरीकार म्हणून केला आहे. १९६५ मध्ये द न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केलेल्या लेखात त्यांना भारतातील विपुल लेखन करणार्या कथाकारांपैकी एक म्हणून गौरवण्यात आले होते. बेळगावजवळ जन्मलेले माळगावकर हे देवास या माजी संस्थानाच्या पंतप्रधानांचे नातू. त्यांनी दुसर्या महायुद्धात सैन्यात सेवा केली, ते एक मोठे शिकारी, शेतकरी, खाण मालक आणि साहसी स्वभावाचे होते. पुढे त्यांनी पत्रकार म्हणून काम सुरू केले आणि त्यानंतर पुस्तक लेखनाला सुरुवात केली. त्यांचे कार्य त्यांच्या वैयक्तिक जीवनाप्रमाणेच वैविध्यपूर्ण आहे आणि त्यात इतिहास, प्रणय आणि लष्करी जीवन यांचे मिश्रण आहे. त्यांच्या काही प्रमुख कामांमध्ये द प्रिन्सेस, द डेव्हिल्स विंड: नाना साहेब्स स्टोरी, आणि द सी हॉक: लाइफ अँड बॅटल्स ऑफ कान्होजी आंग्रे यांचा समावेश आहे.
"B.D.KHER, WHO AUTHORED ABOUT 117 BOOKS DURING HIS LIFE TIME, WROTE HIS FIRST BOOK IN 1939. KHER LEFT MARATHI DAILY KESARI AS AN ASSOCIATE EDITOR AFTER 22 YEARS OF SERVICE. LATER, HE JOINED SAHYADRI AS THE EDITOR AND STAYED IN THAT POSITION FOR 10 YEARS. IN 1976, A JAPANESE FOUNDATION HAD INVITED HIM TO WRITE A NOVEL ON THE HIROSHIMA BOMBING INCIDENT. KHER RECEIVED AWARDS FOR HIS NOVELS LIKE ANANDBHAVAN, HASRE DUKKHA, HIROSHIMA, SAMAGRA LOKMANYA TILAK ETC. HE AUTHORED V D SAVARKARS BIOGRAPHY YADNYA. "
"भा.द. खेर यांचा जन्म अहमदनगरमधील कर्जत येथे झाला. ते वीस वर्षे दैनिक केसरीचे सहसंपादक आणि दहा वर्षे सह्याद्रीचे संपादक होते. समग्र टिळक व सावरकर साहित्य, यांचेही त्यांनी संपादन केले. आजवर त्यांची जवळपास शंभर लहान-मोठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चरित्रात्मक कादंबरी हा वाङ्मयप्रकार त्यांनीच प्रथम मराठीत आणला. त्यापैकी सावरकरांवरील यज्ञ, चाफेकर बंधूंवरील क्रांतिफुले, महाभारतावरील कल्पवृक्ष, झाशीच्या राणीवरील समर सौदामिनी, चार्ली चॅप्लिनवरील हसरे दु:ख, श्रीकृष्णावरील सारथी सर्वांचा या कादंबऱ्या विशेष गाजल्या. तसेच जपानमधील अणुसंहारावरील हिरोशिमा ही कादंबरीही गाजली. याशिवाय दि प्रिन्सेस, वादळवारा, अधांतरी ही भाषांतरित पुस्तकेही लोकप्रिय ठरली. त्यांनी पन्नास वर्षे अव्याहत लेखन केले. पुरस्कार : • आनंदभवन कादंबरीला १९७४ चे सोव्हिएत लॅन्ड नेहरू अॅवॉर्ड. • हिरोशिमाला १९८४ चे सोव्हिएत लॅन्ड नेहरू अॅवॉर्ड. • हिरोशिमाला १९८४ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार. • हसरे दु:खला १९९३ चा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार."