‘पिझ्झा टायगर’ हे डॉमिनोज पिझ्झा या आज जगभर विस्तारलेल्या पिझ्झाच्या फास्ट फूड साखळीचा संस्थापक टॉम मोनाघन याचे आत्मचरित्र आहे. लहानपणापासून अतिशय कष्टमय जीवन जगलेल्या टॉमने जीवनाच्या एका टप्प्यावर डॉमिनोझ पिझ्झाची सुरुवात केली. अनंत अडचणींना तोंड देत त्याने पिझ्झा स्टोअर सुरू केलं आणि त्यातून एका मोठ्या पिझ्झा-साखळीची निर्मिती झाली. जगभर तिचा विस्तार झाला. तर, टॉमची ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायक आणि वाचनीय आहे.