* नवी पिढी घडवणारा,
* कुटुंबव्यवस्थेला आकार देणारा,
* घराघरात सुसंवाद राखणारा...
समाजात स्त्रीचं स्थान जितकं महत्त्वाचं, आदराचं, तितका तो समाज सभ्य, सुसंस्कृत... मुलगी, बहीण, मैत्रीण, आई, पत्नी वा अन्य जिव्हाळ्याची नाती... स्त्रीमुळे नातेसंबंधात एक वेगळीच मृदुता, जिव्हाळा, माया, प्रेम उत्पन्न होतं...
खरी आत्मनिर्भरता येते आंतरिक बदलातून, वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून, शास्त्रीय ज्ञानातून, निकोप शरीरस्वास्थ्यातून आणि तर्कशुद्ध विचारसरणीतून... केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आत्मनिर्भर होऊन आपला व्यक्तिमत्त्वविकास कसा साधावा याविषयी सुबोध आणि उपयुक्त मार्गदर्शन या पुस्तकात उपलब्ध आहे...