Tumhi...Janmasidhha Jete!: Learn 24 Transformational Life skills for Success, Entrepreneurship and Mission Developed India / ??????, ???????? ??? ?????? ????????? ???????????????? ???? ?????????????? ?? ???? ??????? ?????????,?? ??? ????????????????

· Notion Press
eBook
140
หน้า

เกี่ยวกับ eBook เล่มนี้

आपल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये जे काही कच्चे दुवे आहेत त्यांना हेरून ते बुजविण्याच्या दिशेने हे पुस्तक प्रभावीपणे काम करते. युनेस्कोच्या अनुसार कोणत्याही शिक्षणव्यवस्थेचे चार प्रमुख सूत्र असतात ती म्हणजे अधिकाधिक माहिती प्राप्त करणे, उद्दिष्टाची पूर्तता करणे, एक योग्य नागरिक घडवणे आणि इतरांशी वागताना माणुसकीचे जतन करणे, हा ता चार सूत्र. आपल्या विद्यमान शिक्षणव्यवस्थेतून माहिती-ज्ञान यांची प्राप्ती तर होते परंतु इतर तीन सूत्रांचा त्यात अभाव प्रकर्षाने दिसून येतो. शिक्षणाच्या चारही सूत्रांना सशक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न म्हणून हे पुस्तक आहे. या पुस्तकातील २४ सूत्रे आणि अखेरीस देण्यात आलेली नवनिर्माणशील प्रश्नावली, या दोन गोष्टी तुमचा दृष्टिकोन बदलण्याची क्षमता राखून आहेत. आज आपण नव्या भारताची निर्मिती आणि यश यांविषयी चर्चा करत असताना त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक अधिक झळाळून उठते. कोणत्याही विकसनशील देशाच्या सरकार आणि जनतेसाठी हे पुस्तक म्हणजे एक नवनिर्माणाची संजीवनी आहे. ही संजीवनी प्रत्येकाने प्राप्त केली तर देशाची समग्र जनता एक विकसित व्यक्ती म्हणून परिवर्तित होईल आणि त्याचा अंतिम फायदा देशाला होईल.  

เกี่ยวกับผู้แต่ง

पुस्तकाचे लेखक श्री. नवीन चौधरी, यांनी आयआयटी, धनबाद येथून खणिकर्म अभ्यासक्रमातील अभियंता पदवी प्राप्त केली आहे. तसेच मॅनेजमेंटचे शिक्षणही त्यांनी घेतलेले आहे. टाटा आणि लाफार्ज यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी १० वर्षे नोकरी केली. त्यानंतर नोकरीचा त्याग करत ‘पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्मेशन’ सारख्या नवनिर्माण प्रशिक्षण पद्धतीवर भर देत त्याद्वारे देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या आणि नवउद्यमींना प्रशिक्षण देण्याच्या क्षेत्रात ते गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत आहेत. एक उत्साही, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले श्री. नवीनजी प्रखर राष्ट्रभक्त असून भारताला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात. देशाला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत पाहण्यासाठी प्रयत्न करणारे लेखक महोदय नागरिकांसाठी तसेच सीईओंसाठी नवनिर्माणास समर्पित असेलल्या शिक्षणाचा प्रसार करतात. विकसित भारताचे हे स्वप्न श्री. नवीन यांना सतत जागरूक ठेवते. कमीतकमी १० कोटी भारतीयांना नवनिर्माण अभ्यासक्रमाची दीक्षा देण्याचे आणि १० लाख उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचा त्यांचा संकल्प आहे. फाऊंटनहेड कंपनीचे संस्थापक असलेल्या श्री. नवीनजी यांचा कमीतकमी १००० मेंटॉर्स घडविण्याचा ध्यास आहे. त्याचबरोबर ते ‘साई इम्पार्मेंट फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेचे मॅनेजमेंट ट्रस्टी असून गरजूंना सशक्त आणि बलशाली बनविण्याच्या कार्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे.  

ให้คะแนน eBook นี้

แสดงความเห็นของคุณให้เรารับรู้

ข้อมูลในการอ่าน

สมาร์ทโฟนและแท็บเล็ต
ติดตั้งแอป Google Play Books สำหรับ Android และ iPad/iPhone แอปจะซิงค์โดยอัตโนมัติกับบัญชีของคุณ และช่วยให้คุณอ่านแบบออนไลน์หรือออฟไลน์ได้ทุกที่
แล็ปท็อปและคอมพิวเตอร์
คุณฟังหนังสือเสียงที่ซื้อจาก Google Play โดยใช้เว็บเบราว์เซอร์ในคอมพิวเตอร์ได้
eReader และอุปกรณ์อื่นๆ
หากต้องการอ่านบนอุปกรณ์ e-ink เช่น Kobo eReader คุณจะต้องดาวน์โหลดและโอนไฟล์ไปยังอุปกรณ์ของคุณ โปรดทำตามวิธีการอย่างละเอียดในศูนย์ช่วยเหลือเพื่อโอนไฟล์ไปยัง eReader ที่รองรับ