काही काही रागदारीत काही काही स्वर वज्र्यच असतात... वज्र्य झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो. तर एक राग उभा करण्यासाठी आपण तो खुशीनं विसरायचा असतो...वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं...! म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाहा लोकप्रिय कथाकार वपु काळे अतिशय सहजतेनं अशी चपखल उदाहरणं देऊन आयुष्यातली गुंतागुंत सोपी करण्याचा नेमका धागा आपल्या हाती देतात. त्यांच्या सर्वच कथांमध्ये कथेच्या ओघात मिसळून असं चिंतन येतं आणि ते वाचकांना विचार करायला लावतं. मुळात कथा अतिशय खुमासदार; सहसा कुणाच्या ध्यानीमनी न येणाऱ्या क्षणांच्या, घटनांच्या झालेल्या. त्याची अभिव्यक्ती असते वपुंच्या खास मिस्कील शैलीत! त्यांच्या लेखनातील जीवनविषयक प्रसन्न, उदार, आशावादी दृष्टिकोनामुळे त्यांची प्रत्येक कथा वाचकाचं मन जिंकून घेते. ‘स्वर'मधील कथाही वाचून संपल्या तरी मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील...
some of the `raga` some keynotes are strictly not excluded, not because they are not suitable; on the contrary they are& excluded to make the `raga` more beautiful, they are; excluded willingly to give a peculiarity and while doing so their existence is not forgotten at all, only it is avoided. That is the reason why my husband cannot fit into your life and memories and why we both cannot fit into each other`s lives." Va Pu has a very peculiar and unique style to handle difficult things in the most simple manner, revealing the harsh and hard cores of truths in a very easy style, untangling the knots smoothly yet firmly and successfully. The success of his stories lies in the selection of the moments. These same moments are witnessed by many but it takes a very sensitive mind to put them into words, needless to say that only Va Pu has the capacity, he gives such strength and dimensions to these moments that they glow in themselves, they make us think, inspect ourselves, contemplate over them. It is his style and freshness with which he sees life, his hopeful and magnanimousness which makes each story a unique piece of life dawdling in our minds hours later.