Vichar Niyamcha Aadhar - Aasha Aani Vishvas (Marathi)

· WOW PUBLISHINGS PVT LTD
4,3
3 críticas
Livro eletrónico
64
Páginas

Acerca deste livro eletrónico

मोठ्या यशामागचा छोटा परंतु महत्त् वपूर्ण दुवा – आशा

निराशा आणि अविश्वास या भावना म्हणजे हळुवारपणे भिनत जाणारं जणू विषच! हे विष मनुष्याला निराशेच्या गर्तेत ढकलून त्याच्या सर्व शक्ती नष्ट करतात. याउलट आशा आणि विश्वास या भावना असं अमृत आहे, ज्याच्या एका थेंबाचा आस्वाद घेतल्यानेदेखील मनुष्य स्वतःमधील सर्वोच्च शक्यता विकसित करण्यासाठी आणि सुखमय जीवनाकडे अग्रेसर होतो.

तुमच्या जीवनात देखील निराशेचं विष भिनायला लागलंय का?
तुमच्या जीवनात दूर दूरपर्यंत आशेचा अंधूकसा किरणदेखील दिसेनासा झालाय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का?
तुमच्या मनात सतत अडचणींशी झुंजत राहण्याऐवजी सर्व समस्यांतून मुक्त होण्याचे विचार येतात का?
तुम्ही निराशेचा काळोख मिटवून उत्साह, आशा आणि विश्वास यांच्या प्रकाशात पुढील मार्गक्रमण करू इच्छिता का?

वरील सर्व प्रश्नांचं उत्तर जर “हो’ असेल, तर हे पुस्तक तुमच्या मनात विश्वासासह सतत आशा जागवेल.

आशा सुखी जीवनातील असा दुवा आहे, जो छोटा असूनदेखील आयुष्याचा मुख्य आधार आहे. आशेच्या आधारस्तंभावर भक्कमपणे उभं राहिलेल्या तुमच्या संतुष्ट जीवनासाठी भरघोस शुभेच्छा!

Classificações e críticas

4,3
3 críticas

Acerca do autor

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

Classifique este livro eletrónico

Dê-nos a sua opinião.

Informações de leitura

Smartphones e tablets
Instale a app Google Play Livros para Android e iPad/iPhone. A aplicação é sincronizada automaticamente com a sua conta e permite-lhe ler online ou offline, onde quer que esteja.
Portáteis e computadores
Pode ouvir audiolivros comprados no Google Play através do navegador de Internet do seu computador.
eReaders e outros dispositivos
Para ler em dispositivos e-ink, como e-readers Kobo, tem de transferir um ficheiro e movê-lo para o seu dispositivo. Siga as instruções detalhadas do Centro de Ajuda para transferir os ficheiros para os e-readers suportados.