Ranjak Spardha Ganit (रंजक स्पर्धा गणित ): स्पर्धा गणिताची रंजक बाजू उलगडणारी एक अनोखी सफर

Mathematician Vitthal Jadhav
4.5
2 reviews
Ebook
424
Pages

About this ebook

Note to Reader :

   You can post  suggestion , constructive criticism  to improve book or any question related to any topic at    https://www.facebook.com/vjsmathemagic    OR

https://www.facebook.com/groups/887201061336628/

Group on mathematics for solving reader's doubt, spreading new insight in mathematics by different experts, bringing different researcher together, boosting number sense / logical thinking in student

 Any suggestion or comment to improve book will be duly acknowledged. 

Book Features

  1) Language is simple & easy to understand.

  2) Every lesson is explained conceptually with full of example.

  3) Teaches real mathematics. 

      It help to develop number  sense & logical thinking within student.

      "Logic is soul of mathematics. It found everywhere.  One need logic to become good writer , speaker etc."   

4) Goes from basic to advance level.

5) Explores new method to solve competitive math problem quickly.    New method are developed by using  'recurrance relation in modern    mathematics' & 'Vedic mathematical concept'. 

6) Pictures & pattern are used effectively to taught mathematics.

    " One picture is worth more than thousand word."

7) Each lesson is colorful.

8) Book explore entertaining aspect of competitive math.

9) No more shortcut based learning.

-------------------------------------------------------------------------------

मार्गदर्शक लेख 

        गणित म्हण्जे काय ?

       गणिताचे महत्व काय आहे ?

      स्पर्धा परिक्षांसाठी गणिताचा अभ्यास कसा करावा ?

      गणित अध्ययनाच्या चुकीच्या पध्दती कोणत्या ?

----------------------------------------------------------------------


 गणित  म्हणजे सत्य नव्हे , 

 पण सत्यापर्यंत  पोहचवणारे शास्त्र म्हणजे (तर्कशास्त्र) गणित !

 काय योग्य- अयोग्य, चूक-बरोबर , खरा इतिहास -खोटा इतिहास इत्यादी ठरवण्यासाठी लागणारे मुलभूत निकष देण्याचे कार्य गणिताचे (तर्कशास्त्राचे).

  गणित हा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा आधारस्तंभ  आहे.

गणित म्हणजे केवळ आकडेमोड नाही किंवा पाठांतर केलेल्या सूत्राचा वापर करून  विशिष्ट प्रकारचे स्पर्धा परिक्षांतील प्रश्न सोडवणे नव्हे 

तर गणित म्हणजे काही स्वयंसिध्द मुलभूत संकल्पनांच्या आधारे  अनिश्चित  प्रश्नांचा  अथवा रहस्यांचा  तर्काचा वापर करून उलगडा करणे.

गणित ही मानवाने विकसित केलेली वैश्विक भाषा आहे.

गणित हे शास्त्रांचे शास्त्र आहे.

हाती असलेल्या साधनांचा  / ज्ञानाचा वापर करून तर्कसुसंगत विचारसरणीच्या साहाय्याने इच्छित ध्येयापर्यंत पोहचणे म्हणजे गणित.

 ज्याला गणिताचा हा खरा अर्थ उलगडतो  व जो केवळ स्पर्धा परिक्षांच्या नव्हे तर आयुष्याच्या अनुषंगाने गणित / तर्कशास्त्र शिकतो, तोच आयुष्याचे गणित सोडवू शकतो.

जवळ-जवळ सर्वच क्षेत्रांत गणित डोकावते.

उदा. एखाद्या उत्कृष्ट लेखकाचा एखादा लेख निवडा व त्यातील कोणत्याही परिच्छेदाचे

      निरीक्षण करा, त्यात लगतची वाक्ये आपणांस तर्कशास्त्रीय दृष्टीकोनातून

     सुसंगतपणे माडलेली आढळतील.


गणित अध्ययनाच्या चुकीच्या  पध्दती 

 1)     SI = P * R * N  / 100

        P=  (SI * 100 ) / (R * N)

        R=  (SI * 100 ) / (P * N)

        N=  (SI * 100 ) / (P * R)

        हे चारही सूत्रे पाठ करणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे .


    योग्य पध्दत

        येथे SI = P * R * N  / 100 हे एकच सूत्र लक्षात ठेवणे पुरेसे ठरते.

        तसेच गणितात कोणतेही सूत्र पाठ करायचे नसते, तर ते समजून घ्यायचे असते.

        उदा. SI = P * R * N  / 100  हे सूत्र असेच का ?         

        नेहमी  स्वतःस का ? , कसे  ? याप्रकारचे प्रश्न  विचारा.


      पण आपले दुर्दैव हे की आपणांवर बालपणापासून 

         'गणित खूप अवघड असते '  या विचारांचा  इतरांकडून 

       (अथवा शिकवणी घेणार्‍या शिरोमणींकडून) भडीमार होतो.

        कालांतराने आपणदेखील तेच मानतो.

        मुळातच गणिताचे अज्ञान 

   त्यात शिकवणीत चुकीच्या पध्दतीने शिकवले जाणारे गणित (?)

       यामुळे विषय अधिकच अवघड बनतो.

      आज बहुतांश शिकवणी वर्गांत आपणास चुकीचे गणित शिकवले जाते.

      आणि मजेची गोष्ट ही  की - 'आपण चुकीचे गणित शिकतोय' याचे जाणीवदेखील

      आपणास नसते.

      जर आपणास गणित म्हणजे काय  अथवा योग्य गणित कोणते ?

      हेच माहित नसेल तर 'आपण चुकीच्या पध्दतीने गणित शिकतोय का योग्य पध्द्तीने'

      हे कळेल तरी कसे ?

     एखाद्या व्यक्तीचे शोषण होतेय , पण त्याला त्याची जाणीव नसेल तर

     अन्यायाविरूध्द लढण्याचा प्रश्नच येत नाही ?

      (यालाच तत्वज्ञानाच्या भाषेत Prototype Paradox / Life Paradox  म्हणता 

        येईल.)

     येथे आपण न लढण्याबद्द्ल त्या व्यक्तीला दोषी ठरवू शकत नाही.

    मग त्यास दोषी कधी ठरवता येईल ?

    ज्यावेळेस त्या व्यक्तील होणार्‍या अन्यायाची जाणीव होवूनही तो / ती निमूटपणे  अन्याय सहन करत असेल त्यावेळेस.

 तर असो, सांगायचा उद्देश-  गणित चुकीच्या पध्दतीने शिकण्यात विद्यार्थ्यांचा दोष नसतो तर

तो 'चुकीचे गणित' शिकवणार्‍या  शिक्षकांचा  अथवा व्यापारी तत्वांवर केवळ शंख-शिंपले (पैसे) गोळा करण्यासाठी काढलेल्या पुस्तकांचा असतो.


ज्या समाजातील अधिका-अधिक व्यक्ती या पैशाच्या पुढे जावून एका उदात्त दृष्टीकोनातून सेवांची निर्मिती करतात, इतरांना समजून घेवून त्यांना उन्नत 

बनवतात, सर्जनशीलतेला चालना देतात, वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून काळाच्या पुढे धावण्याचा प्रयत्न करतात , तो समाज खर्‍या अर्थाने पुढे जातो. 

अन्यथा एका मुखाने जगाला पर्यावरणाचे रक्षण करा' असे  सांगायचे व दुसर्‍या 

बाजूने मात्र पर्यावरणास हानी पोहचवणार्‍या अनावश्यक वस्तूंचे अवाजवी

प्रमाणात केवळ अधिकाधिक अर्थार्जन व्हावे या हेतूने उत्पादन वाढवण्यात खरेच शहानपण आहे का ?

व्यवहारातील बर्‍याच वस्तू एकमेकांत शेअर केल्यास  पर्यावरणाची होणारी अपरिमीत हानी टाळता येईल , उत्पादनासाठी लागणार्‍या वेळेचा अपव्यय टाळता येईल व त्याच वेळेचा इतर नवीन सेवांची निर्मिती करण्यासाठी  सदुपयोग करता येईल.

पण आज मानवास प्रत्येक वस्तू स्वंतंत्रपणे स्वतःच्या मालकीची हवी आहे.   

त्यातूनच वस्तूंची अवास्तव मागणी वाढते व मागणीच्या अनुषंगाने पुरवठा वाढतो.

त्यातल्या त्यात आज देखील कोट्यावधी व्यक्तींना स्वतःच्या अस्तित्वासाठीच व दोन वेळ्च्या पोट्याच्या प्रश्नासाठीच लढावे लागत असेल तर काय योग्य वा काय अयोग्य याचा विचार करण्याचा वेळच तरी कोठे असतो.

त्यातल्या त्यात स्वतःच्या धुंदीतच आत्ममग्न झालेल्या सधन / सुशिक्षित समाजाला

देखील या समाजाकडे पाहण्याचा वेळच तरी कुठे आहे ?

भावी काळात कदाचित समाजाला जागृत करण्याची जबाबदारी तुमच्यावर असेल.

आपण ज्या समाजातून / ज्या भागातून पुढे आलो त्या समाजाच आपण काही तरी देणं

लागतो, ही भावना कधीही विसरू नये. पण म्हणून केवळ आपल्याच भागाचा इतरांकडे डोळेझाक करून विकास करणे अथवा केवल स्वतःचीच खळगी भरण्याचा प्रयत्न करणेदेखील चुकीचे. विकास करावा मात्र तो समतोल करावा. विकासाचे विकेंद्रीकरण करावे.


सांगण्याचा उद्देश विद्यार्थ्यांनी योग्य पध्दतीने गणित शिकण्यासाठी

ते योग्य शिक्षकांकडून अथवा पुस्तकांतून  शिकावे,

स्वतःची पुस्तके इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करावे

त्यातूनच कागदाचा अपव्यय टळेल व दरवर्षी कोट्यावधी वृक्षांना वाचवता येईल.

शक्य असल्यास Digital Ebook  चा वापर करावा.

मुळात गणित हा खूपच सोपा विषय आहे.

गणित विषयाचे सौंदर्य म्हणजे यात इतर विषयांप्रमाणे यात जास्त लक्षात ठेवावे लागत नाही. येथे केवळ मुलभूत नियम लक्षात ठेवावे लागतात व त्यांच्या साहाय्याने  प्रश्नाची उकल  काढण्यासाठी 'तर्काचा वापर कसा करायचा ?' हे शिकावे लागते.

Ratings and reviews

4.5
2 reviews

About the author

Vitthal B. Jadhav  is  Indian Mathematician , Lyricist, Poet,  Practical Philosopher. He is inventor of many mathematical  theorem / methods such as VJ's Golden Lemma , VJ's Matrix Method (one line method for solving equation & computing n'th root of real number), VJ's Cross Divisibility Test, Indian Fractional Decimal System (novel concept for advancement of decimal number system), Sliding Ruler Multiplication, Two Step Method for Quick Squaring etc..   He spent / wasted most of his life in pursuit of understanding mathematics , its beauty . Thereafter he engaged itself in understanding self, universe - its nature , basic defect in human thinking etc philosophical & psychological aspect..  

To follow on Facebook refer 

https://www.facebook.com/Mathematician-Vitthal-Jadhav-1727694237442366/?ref=bookmarks

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.