प्रत्येक लढणार्या सौनिकाच्या मागं त्याला मदत करणारी दहा माणसं असतात. त्याला रसद पुरवठा करणारे, त्याच्या आरोग्याची काळजी घेणारे, एवढेच नव्हे तर त्याच्या धार्मिक भावनांची काळजी घेणारे पथक, ही सर्व पथके युद्ध जिंकण्यासाठी लढणार्या सौनिकाला सातत्यानं मदत करीत असतात. शत्रूची माहिती सौन्याधिकार्यांना पोहोचविणारे गुप्तहेर, शत्रूच्या पिछाडीला उतरून घातपात करणारे आणि त्या देशातील परकीय आक्रमकांविरुद्ध लणारे भूमिगत कार्यकर्ते अशा अनेक घटकांची आघाडीवर लढणार्या सौनिकास साथ मिळत असते. अशा अनेक घटनांची आणि घटकांची माहिती वाचकाला ह्या युद्धकथांमधून वाचायला नक्कीच आवडेल.