पाटलांचं सारं साहित्यविश्व शब्दकळेच्या लावण्यानं रसरशीत, चौतन्यमय आणि सालंकृत झालेलं आहे. म्हणूनच त्यांच्या साहित्याला अस्सल मराठी मातीचा सुवास लाभला आहे आणि रसरंगगंधानं ते चुरचुरीत खमंग झालं आहे.त्यांची मराठमोळी भाषा, गतिमान निवेदन आणि चटपटीत संवाद यांच्या लयकारीतएक खास शौली आहे.त्यामुळं ते मराठी ग्रामीण कथेचे एक शौलीदार, कसदार शिल्पकार म्हणून मान्यता पावले असून त्यांनी मराठी कथाविश्व समर्थ, समृद्ध आणि श्रीमंत केलं आहे. या सार्या गुणधर्मामुळं त्यांच्या साहित्याला लोकमान्यता आणि राजमान्यता मिळाली आहे.