‘प्रात्यक्षिक भूगोल’ हा निरीक्षण व कौशल्याधीष्ठीत विषय आहे. २१ व्या शतकातील दूर संवेदन (Remote Sensing), भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System), जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (Global Positioning System) इ. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रात्यक्षिक भूगोलाच्या अभ्यासास अचूकता व गतिमानता प्राप्त झालेली आहे.
‘भूगोलशास्त्र (Geography)’ हा चार भिंतीबाहेर अनुभवातून शिकण्याचा विषय आहे. हा अनुभव घेण्यासाठी नकाशा मार्गदर्शक ठरतो. या नकाशाची निर्मिती केव्हा झाली? त्याचे मुलभूत घटक कोणते? नकाशाशी संबंधित शास्त्रास काय म्हणतात? नकाशात सांख्यिकी कोणत्या पध्दतीने दर्शवितात? सर्वेक्षण म्हणजे काय? सर्वेक्षणाचे प्रकार कोणते? नकाशात दिशा, अंतर, क्षेत्र कशा रीतीने मोजतात? अंतर व क्षेत्र मापन करण्याची एकके कोणती? क्षेत्र भेट म्हणजे काय? असे अनेक प्रश्न जिज्ञासा उत्पन्न करतात. अशा नकाशाशास्त्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरे निश्चितच या पुस्तकात आपणास मिळतील असे वाटते.
Professor & Head, Department of Geography, SSGM College, Kopargaon