नाडकर्ण्यांचा वाडा (Nadkarnyancha Wada)

· Kokan Media (E-Book publisher for Padmanabh Prakashan)
5.0
2 reviews
Ebook
22
Pages

About this ebook

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ गाव. या गावात 40 खोल्यांचा, दुमजली, चौसोपी अवाढव्य नाडकर्ण्यांचा वाडा होता. या वाड्याचे प्रवेशद्वार म्हणजे दिंडी दरवाजा हा एवढा प्रशस्त होता की, हत्तीच्या अंबारीसह या दरवाज्यातून अंगणात येता येत होते. यावरुन वाड्याचा प्रशस्तपणा लक्षात येईल. दुमजली असलेल्या या वाड्यात दिंडी दरवाजावरती नगारखाना होता. वाड्यामागे घोड्यांची पाग होती. माती आणि लाकूड या दोनच गोष्टींचा वापर करून वाड्याचे बांधकाम केलेले होते. तळमजल्यावरिल खोल्या पंधरा फुट उंचीच्या व त्यावर तेवढयाच उंचीचा पहिला मजला. पावसात नळ्यांच्या छपरावरून गळणार्‍या पागोळ्यांचे पाणी पावळ्यात यायचे तेथून दगडांच्या अंडर ग्राऊंड व्यवस्थेतून वाड्यामागील तळ्यात हे पाणी सोडले जायचे. या वाड्याच्या स्थापत्यकाराला निश्‍चितच दाद द्यायला हवी.


हा वाडा नक्की कधी बांधला गेला या बाबत निश्‍चित माहिती नाही. परंतु वाड्याच्या देवघरातील पितळी साळुंखीवर स्थापना शके १७३० असा उल्लेख आहे. म्हणजे कदाचित त्यापूर्वीच हा वाडा उभा राहिला असावा. भावी पिढीला नाडकर्ण्यांचे हे वैभव कळावे, त्यांना वाडा अनुभवता यावा म्हणून हा लेखन प्रपंच. या वाड्यातच माझा जन्म झाला. इथेच मी खेळले, बागडले, शिकले, मोठी झाले. इतकी वर्षे झाली तरीही माझ्या मनातल्या या वाड्याबद्दलच्या आठवणी आजही ताज्या आहेत.


- सौ. स्मिता (नाडकर्णी) अनगोळकर

Ratings and reviews

5.0
2 reviews
Chandrashekhar Wagle
May 17, 2020
अतिशय छान.
Did you find this helpful?

About the author

सौ. स्मिता (नाडकर्णी) अनगोळकर (Mrs. Smita Nadkarni-Angolkar)

कणकवली रेल्वे स्टेशन रोड, नाथ पै नगर, मु. पो. ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग - ४१६६०२

मोबाइल : (+91) 9970374915, 9421562024

ई-मेल : smita123angolkar@gmail.com

Padmanabh Prakashan, Ratnagiri (पद्मनाभ प्रकाशन, रत्नागिरी)

ई-मेल : sanna.kulkarni@gmail.com



Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.