21 मॅजिकल मॉर्निंग्ज
दररोज, प्रत्येक सकाळ रचनात्मक कशी बनवाल?
आपण जसं, दररोज पिण्याचं पाणी बदलतो, तसंच जीवनात प्रसन्न, फ्रेश राहण्यासाठी उत्साह आणि बदल आवश्यक आहे.
आज मनुष्य यंत्रवत जीवन जगत आहे. रोज सकाळी उठायचं, तयार व्हायचं, ऑफिसमध्ये जायचं, जेवायचं आणि रात्री झोपायचं… विचार करायला त्याला वेळच नाही.
हाच दिनक्रम सतत सुरू असेल तर काही वर्षांनंतर तो कंटाळून जाईल आणि स्वतःच समस्या बनेल. मात्र काही लोक असे असतात, जे वेगळं काहीतरी करायला उत्सुक असतात, समाधान शोधतात.
मनुष्याला दररोज नवीन काहीतरी हवं असतं, ज्यात रोमांच हवा, जे करताना उत्साह असावा, विकास व्हावा.
हाच हेतू लक्षात ठेवून प्रस्तुत पुस्तक लिहिलं गेलंय. आपण सकाळच्या कार्यांमध्ये छोटे परंतु रचनात्मक बदल करून मोठे परिणाम साध्य करू शकतो. जसं,
जीवनात आपल्याला प्रत्येक वयात नावीन्य मिळेल.
बोरडममधून मुक्त होऊन उत्साहाच्या दिशेने वाटचाल होईल.
यंत्रवत जीवनातून मुक्ती, सजगतेशी युक्ती होईल.
आपल्यात रचनात्मकतेचे गुण विकसित होतील.
विकासाचे नवे पैलू आपण प्राप्त कराल.
चला तर, या पुस्तकात दिलेल्या 21 पद्धतींद्वारे आपली सकाळ मॅजिकल बनवा, जीवनात स्वास्थ्य आणि मानसिक क्षमता वाढवा. रोजची प्रत्येक सकाळ रचनात्मक बनवा, आगामी आनंदमयी जीवनाचं स्वागत करा…