आधुनिक युगातील ईश्वरावतार श्रीरामकृष्णांनी आताच्या कलियुगासाठी नारदीय भक्तीच श्रेयस्कर आहे, असे सांगितले आहे. ते म्हणतात की, “कलियुगी भक्तियोग. नारदीय भक्ती. ईश्वराचे नाम-गुणसंकीर्तन करणे आणि व्याकुळ होऊन प्रार्थना करणे की ‘हे ईश्वरा, मला ज्ञान दे, भक्ती दे. मला दर्शन दे.’ ... ‘कलियुगात उपाय भक्तियोग, भगवंताचं नामगुणगान नि प्रार्थना. भक्तियोगच युगधर्म.’ ” (श्रीरामकृष्ण-वचनामृत, पृ.५६० व पृ.१०२) त्यांच्या अमृतोपम वचनाच्या साहाय्याने आपल्याला ह्या पुस्तकाचे महत्त्व कळते.