MADHYARATRICHE PADGHAM

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.3
28 reviews
Ebook
148
Pages

About this ebook

‘तुम्ही पाहिलं असेल बघा त्यांना. ते हो - गुळगुळीत टक्कल. अगदी तुळतुळीत काळ्या गोट्यासारखा चेहरा! पोपटाच्या चोचीसारखं नाक! आणि डोळे... अगदी रोखून पाहणारे डोळे! मला तर त्यांच्या डोळयांची भीतीच वाटते......त्या दिवशी, रात्रीची गोष्ट. मी डॅडींच्या जवळ झोपलो होतो आणि एकदम मला जाग आली. सगळं घर हादरत होतं. झांजा वाजत होत्या. कोणीतरी पडघमवर ‘धम धम’ वाजवत होतं. त्याच ‘धम धम धम’ तालात सगळं घर हलत होतं. मग सगळं एकाएकी थांबलं. एक ‘गूंऽऽ’ असा भुंग्यासारखा आवाज यायला लागला. मग पुन्हा ‘धम धम’ वाजायला लागलं. मला फारच भीती वाटायला लागली. तेव्हा मी डॅडींना हलवून उठवायला लागलो... आणि एकदम लक्षात आलं: मी कुणाला हलवतोय? बिछान्यात आहेच कोण? बिछाना रिकामा - डॅडी जवळ नाहीतच. मी एकटाच! काळोख... आणि ‘धम धम’ वाजतंय. मी भयंकर घाबरून किंकाळी फोडली...’ ओळखीच्या - बिनओळखीच्या वातावरणांमध्ये उमटणारी अकल्पित भयाची ही वलये... गारठून टाकणारी... काल्पनिक असूनही अतिशय खरीखुरी. कदाचित कधीच प्रत्यक्ष न अनुभवलेली... तरीही मनात खोल कुठेतरी दडून बसलेली भीती... तिचे पडघम वाजू लागतील या कथा वाचताना. तो आवाज कान देऊन ऐका... तुमच्या मनात आजवर सीलबंद करून ठेवलेल्या त्या भीतीचा निचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपणच मनात दडवून ठेवलेल्या गूढाशी, अत्यंत तरलपणे आपली ओळख करून देणाऱ्या, एका श्रेष्ठ कथाकाराच्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या कथांचा हा संग्रह. 

Ratings and reviews

4.3
28 reviews
कौस्तुभ
June 4, 2020
पुस्तक वाचायला घेतले ते पूर्ण झाल्याशिवाय ठेवलेच नाही.आता डोळे दुखायला लागले आहेत आणि सगळी कडे काळ्यावर पांढरी अक्षरं दिसावी तसे सगळीकडे अक्षरे दिसत आहेत पण एका चांगल्या गूढ कथा पुस्तकासाठी येवढे डोळ्यांचे बलिदान देऊच शकतो.खेकडा नंतर हे दुसरं पुस्तक माझ्या वाचनात आलं वातावरण निर्मिती आणि पुढे काय होईल ह्याची उत्सुकता व पहिली कथा संपल्यावर दुसरी वाचायची ओढ ह्या मुळे पुस्तकं खाली ठेवताच येत नाही.ह्यातील त्या लहान खुनी लहान मुलाची कथा आणि मांजराची कथा तर उत्तमच.
6 people found this review helpful
Did you find this helpful?
Vallabh Kadam
September 9, 2019
Nice one
6 people found this review helpful
Did you find this helpful?
Rahul
August 30, 2016
Must read
22 people found this review helpful
Did you find this helpful?

About the author

 

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.