पाश्चात्त्य देशांत वेदान्ताचा आणि हिंदू धर्माचा प्रचार केल्यानंतर 1897 साली स्वामी विवेकानंद जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांनी कोलंबोपासून अल्मोर्यापर्यंत ठिकठिकाणी जी व्याख्याने दिली त्यांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केला आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतात जी व्याख्याने दिली ती अत्यंत ओजस्वी व स्फूर्तिदायक असून त्यांत त्यांनी वेदान्त, धर्म, संस्कृती, देशप्रेम, मातृभूमीसंबंधीचे आपले कर्तव्य इत्यादी विविध विषयांचे विवेचन केले आहे. धर्माचा व तत्त्वज्ञानाचा स्वामी विवेकानंदांनी केलेला अभ्यास किती सखोल आहे व स्वत:च्या उच्च आध्यात्मिक अनुभूतींवर आधारलेले त्यांचे मौलिक विचार किती प्रभावी आहेत हे वाचकांना ह्या सर्व व्याख्यानांवरून उत्तम रीतीने कळून येते. आजच्या काळात राष्ट्रनिर्मितीसाठी असल्या विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. यथार्थ ‘माणूस’ निर्माण करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची भारतातील ही व्याख्याने निश्चित मार्गदर्शक ठरतील.