विश्वात विज्ञानाच्या साहाय्याने आजवर अनेक चमत्कार घडले आहेत. शिवाय, कित्येक आविष्कारांवर आजही संशोधन सुरू आहे. मात्र, आदर्श आणि प्रशिक्षित मनाचा चमत्कार आपण कधी पाहिलाय? याचं उत्तर ‘नाही’ असं असेल, तर निश्चितच हे पुस्तक आपल्यासाठी आहे. सर्व कल्पनांपलीकडे असलेला सर्वांत मोठा चमत्कार या प्रशिक्षित आणि आदर्श मनासोबतच घडू शकतो, ही बाब आपण प्रस्तुत ‘विज्ञान मनाचे’ या पुस्तकाद्वारे जाणणार आहोत. आपलं मन दुःखी, त्रस्त होईल, त्यावेळी निम्नलिखित बाबींवर आपलं लक्ष
केंद्रित करा.
* मन म्हणजे काय? मनाचे विविध पैलू कोणते? मनाचे बुद्ध कसे बनाल?
* विचार आणि भावनांद्वारे मन सत्यावर कसं आरूढ होतं?
* सुलभ रूपकांद्वारे मनाची कार्यपद्धती जाणा
* मनाचे विकार आणि त्यांतून मुक्त होण्याचे मार्ग
* मनाच्या सर्व नकारात्मक सवयींपासून मुक्तीचे रचनात्मक उपाय
* मन आदर्श बनवण्याचा उद्देश आणि योग्य पद्धती
* मन मनोरंजनात कसं अडकतं, त्यातून मुक्त होण्याचे उपाय
* मनाची नाटकं अनेक, त्यांतून मुक्त होण्याचे उपायही अनेक!
* मनाचा बुद्ध बनण्यासाठी आवश्यक 8 पावलं
प्रस्तुत पुस्तकाच्या साहाय्याने आपण सुप्त मनाच्या अनोख्या रूपाशी परिचित होऊन मनाचे बुद्ध बनण्याचा राजमार्ग जाणाल, जो मन त्रस्त होण्यापूर्वीच आत्मसात करायला हवा.