पत्रकार, संपादक, लेखक, आणि राजकीय विश्लेषक
सुदर्शन रापतवार हे मराठवाड्यातील प्रतिथयश पत्रकार आहेत. आज त्यांची ओळख मराठवाड्यातील एक अभ्यासु पत्रकार,संपादक,लेखक,राजकीयविश्लेषक म्हणून आहे. अगदी तरुण वयात त्यांनी नांदेड येथील गोदातीर समाचार या दैनिकातुन कंपोजिटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली, एका सामान्य दैनिकातुन पत्रकारितेची सुरुवात करणा-या रापतवार यांनि मराठवाडा साथी, चंपावतीपत्र, लोकपत्र, लोकमत मध्ये सलग १५ केलेले अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी चे काम अत्यंत प्रभावी ठरले पुढे , पुढारी, एकमत, दिव्य मराठी या दैनिकात काम केले. या कालावधीत त्यांची व्रत्तपत्राशी जोडली गेलीली नाळ अधिक व्यापक आणि द्रढ होत गेली आहे.