सलग १७ वर्षे लोकमत सारख्या प्रतिथयश दैनिकात काम करून बाहेर पडल्यानंतर माझ्या लिखाणाची सवय बंद पडेल की काय अशी सल्ला सतत शंका जत होती. यावेळी मला फेसबुक ने आधार दिला. बातम्या आणि बातम्यांच्या विषयाव्यतिरिक मला सहज सुचत गेलेल्या अनेक घटनां आणि विषयांवर मी सतत लिहीत गेलो.
महत अनेकजण मला व या काळात फेसबुकवर माझा स्वतंत्र वाचक वर्ग निर्माण झाला. अनेक कर सार्वजनिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून मी गेलो असता कार्यक्रमानंतर व्यक्तिशः भेटून फेसबुक वरील माझ्या लिखाणाची प्रशंसा करीत, यात महिलांचाही सहभाग जुट असायचा. ज्यांना मी व्यक्तीशः ओळखतही नाही अशी अनेक जण मला भेटून आपल्या मुन भावना व्यक्त करीत असत. फेसबुकवरील लिखाणा खालील कॉमेंट बॉक्समध्ये सदरील प पोस्ट वाचताना आपण ती स्वतः अनुभवत आहोत असा भास होत असल्याच्या प्रतिक्रिया घ ही लिहिल्या जायच्या. यावेळी वाचकांच्या प्रतिसादामुळे मी खरेच भारावून जायचो. एखाद वृत्तपत्र हातात नसतांनाही वाचकांचा, सहकारी मित्रांचा, राजकीय सामाजिक कार्यकत्यांचा प्रतिसाद मला सतत लिहिण्याचे प्रोत्साहन द्यायचा !
फेसबुक वरील पाच हजार मित्रांची मर्यादा संपल्यानंतर ही अनेकांच्या आलेल्या रिक्वेस्टचा नम्रपणे विचार करीत मी 'लोकमत परिसर' हे माझे स्वतंत्र वेब पेज निर्माण केले. मोठ्या दैनिकाचा प्रतिनिधी नसतांनाही फेसबुक, 'लोकमत परिसर' वेब पेज बरील लिखाणाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मी 'माध्यम' हे माझं वेब पोर्टल सुरु केले. गुगल सोबत स्वतंत्र करार करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे माध्यम फार प्रभावी ठरले.
आज 'माध्यम' या माझ्या वेब पेज चा ही मोठा वाचकवर्ग निर्माण झाला आहे. 'फेसबुक', 'लोकमत परिसर आणि 'माध्यम' या वेगवेगळ्या वॉलवर सहज लिहित गेलेल्या व वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या निवडक पोस्टचं एखादं पुस्तक असावं ही सुचना माझे अनेक मित्र मला करीत असतं. आज मित्रांनी केलेल्या या सुचनांच्या अनुषंगाने मी 'सहज सुचलं म्हणून' हे फेसबुकवर मी लिहिलेल्या स्वतंत्र पोस्टचं पुस्तक काढण्याचा निर्णय घेतला आहे.
फेसबुक वरील मी केलेलं हे सगळं लिखाण 'सहज सुचलं म्हणून' केलेलं आहे. त्याच मुळं या पुस्तकाला नाव ही 'सहज सुचलं म्हणून' दिलेलं आहे.
या पुस्तकाच्या लेखन, मांडणी व सजावट, शुद्धलेखन आणि छपाई याबाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. या पुस्तकाच्या लेखनासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी माझी पत्नी सौ. उर्मिला, मुले अनिरुद्ध आणि आशितोष, सुनबाई सौ. स्मिता नेक यांनी मला सहकार्य केले. या पुस्तकातील शुद्धलेखनाच्या तपासणीसाठी कविवर्य राजेश रेवले व कवी-साहित्यिक गोरख शेंद्रे यांचे विशेष सहकार्य लाभले तर या पुस्तकाची सर्व अक्षर नाग जुळवणी व सजावट संजय गिरी यांनी केली. या पुस्तकाचे अत्यंत आकर्षक आणि सुंदर असे मुखपृष्ठ पुणे येथील मेटल आर्टविस्ट माझे बंधू गिरीश रापतवार यांनी केले. या पुस्तकाची पाठराखण प्रख्यात गजलकार प्रा. मुकुंद राजपंखे यांनी केली. या पुस्तकाची अत्यंत आकर्षक च्या छपाई आर्टी ऑफसेट यांनी वेळेत करुन दिली. या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक पूर्ण बादे होऊ शकले नसते. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ज्या ज्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी मला सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार !
सहज सुचलं म्हणून ..!
सुदर्शन रापतवार
पत्रकार, संपादक, लेखक, आणि राजकीय विश्लेषक 9422240017
सुदर्शन रापतवार हे मराठवाड्यातील प्रतिथयश पत्रकार आहेत. आज त्यांची ओळख मराठवाड्यातील एक अभ्यासु पत्रकार,संपादक,लेखक,राजकीयविश्