मती गुंग करणा-या घटना, अधिकाधिक गुंतागुंत वाढवणारी परिस्थिती, गुन्ह्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी करावी लागणारी प्रयत्नांची शर्थ या सा-या गोष्टी पोलिसांच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. कित्येकदा गुन्हा करुन गुन्हेगार हातावर तुरी देऊन नाहीसा होतो. कित्येक वर्षं वाट पाहिल्यावर त्याचे धागेदोरे हाती लागतात. गुन्ह्यापाठीमागे वापरलेल्या युक्त्या पोलिसांना अचंबित करतात. अशाच काही अभूतपूर्व घटनांचा हा संग्रह. यात परदेशातील काही घटनांवर आधारित कथाही अंतर्भूत केलेल्या आहेत. त्या वाचताना हेच जाणवते की देश कुठलाही असो; माणसाच्या भावना, वासना, विचार, विकार सर्वत्र सारखेच. त्यामुळे घडणारे गुन्हेही सर्वत्र सारखेच. पोलीसांना होणारे मनस्तापही सारखेच.