Tasker वापरून WaveUp चालू आणि बंद करण्यासाठी एक
Tasker प्लगइन. अधिक तंत्रज्ञानप्रेमींसाठी 😉
हे Tasker प्लगइन Termux:Task वर आधारित आहे आणि
GPLv3 परवान्याअंतर्गत प्रसिद्ध केले आहे. अर्थातच, हे ओपन सोर्स देखील आहे आणि तुम्ही
कोड पाहू शकता.
@Termux टीम: या छान कोडबद्दल खूप खूप धन्यवाद!
कसे वापरावे
★ एक नवीन Tasker Action तयार करा.
★ दिसणाऱ्या Select Action Category डायलॉगमध्ये, Plugin निवडा.
★ दिसणाऱ्या Action Plugin डायलॉगमध्ये, WaveUp निवडा.
★ WaveUp सक्षम (enabled) करायचे की अक्षम (disabled) करायचे, हे निर्दिष्ट करण्यासाठी कॉन्फिगरेशन संपादित करा.
इच्छेनुसार वेव्हअप सक्षम / अक्षम करण्यासाठी हे साधे टास्कर प्लगइन वापरा.