Apayashavar Maat (Marathi): Kshamataprapticha Rahasya

· WOW PUBLISHINGS PVT LTD
3.7
13 則評論
電子書
184
頁數

關於這本電子書

अलौकिक यशप्राप्तीचे उपाय

“तुम्ही कधी अपयशी झालाय का?’

1) होय. यश हेच अपयशाचं फलित रूप आहे. परंतु मनुष्याला जोवर यश मिळत नाही, तोवर तो हे मान्य करत नाही.

“पैसा, पद, प्रतिष्ठा न मिळणं म्हणजेच अपयश आहे का?’

2) पैसा, पद, प्रतिष्ठा प्राप्त न करता येणं म्हणजे अपयश नव्हे, तर निराश होणं म्हणजेच अपयश.

“यश मिळवण्याच्या मार्गात अपयश बळ बनू शकतं का?’

3) होय. अपयशच यशप्राप्तीचं बळ बनू शकतं. अपयश मिळूनही मनुष्य अधिक जोमानं कार्यरत होऊन, अत्यंत कठीण कार्यातदेखील यश प्राप्त करू शकतो. अशी इतिहासात अनेक उदाहरणं आहेत.

“अपयशातदेखील एखादं कौशल्य दडलेलं असतं का?’

4) अपयशामुळेच मनुष्य आपल्या सर्व चुकांमधून मुक्त होतो. तसंच स्वतःमध्ये संयम, विश्वास आणि क्षमता या गुणांचं संवर्धन करून अपयशाशी दोन हात करण्यासाठी सिद्ध होतो, हेच अपयशाचं सौंदर्य, वैशिष्ट्य आहे.

“निराशा आणि अपयश हेच अंतिम यशप्राप्तीचे आधारस्तंभ आहेत का?’

5) अंतिम यशापर्यंत पोहोचण्यासाठी निराशेचा धक्का वरदान आहे.

अपयशाशी सामना करण्याची जिद्द म्हणजे प्रस्तुत पुस्तक… जेे वाचून अपयशाचा एक नवीन अर्थ तुमच्यात उदयास येईल. त्यानंतरच अपयश फलित होऊन तुम्ही यशाचं शिखर गाठू शकाल. जिथे यश आणि अपयश हे एकमेकांचे विरोधक न ठरता परस्परांसाठी पूरक बनतील.

評分和評論

3.7
13 則評論

關於作者

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。