महादजी शिंदे...दौलतीची निरपेक्ष सेवा करणारे...अंतर्गत बंडाळ्यांमुळे व्यथित होणारे...राघोबादादांचा बिमोड करण्यासाठी, इंग्रजांना वठणीवर आणण्यासाठी, मोरोबा आणि बापूंचा नानांना गोत्यात आणण्याचा डाव उधळण्यासाठी, करवीरकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नानांच्या मदतीला धावलेले ...नानांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य न देता उलट महादजींचा द्वेष करूनही उत्तरेत मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित करणारे...कवायती फौज पदरी बाळगणारे...नानांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना उघडउघड शह देणारे...सवाई माधवरावांच्या पायी निष्ठा वाहणारे... इंग्रजांना शरण यायला भाग पाडणारे...भाऊसाहेब तोतया प्रकरणात मदतीला धावणारे...अहिल्याबाईंच्या विरोधात राघोबादादांना साथ देण्यास स्पष्ट नकार देणारे...नानांना दिलजमाई करण्यास भाग पाडणारे...दिल्लीच्या बादशहाला त्याच्या तख्तावर परत नेऊन बसवणारे... अशा महादजींच्या पराक्रमाची आणि स्वामिनिष्ठेची धगधगती कहाणी
Prof. S.S. Desai was born in Balli. His entire education was done through Marathi medium. His primary education was done at Balli and Palole, Lisev (Portuguese) Madgaon and Panaji. Since childhood, reading literature has been his hobby. During his prime years, he read a lot of Marathi, Portuguese, French and English literature. . In 1940, his first story 'Ayushyacha Vasant' was published in the Kala magazine.
He left for Pune to become a journalist in 1944. He worked as a sub-editor in the newspapers like, ‘Lokshakti’, ‘Samachar’, ‘Prabhat’, ‘Samyukt Maharashtra’ etc.
He then left journalism in 1957 and was appointed as an assistant in Mahadev Shastri's 'Bharatiya Sanskriti Kosh' Mandal which again followed by him working as Research Assistant in Tarkattirtha Lakshmanasastri Joshi’s 'Bharatiya Sanskriti Kosh' Board. Later he got promoted and worked as a researcher in an encyclopedia. In the month of December 1964, he was selected as a research fellow in the history department of Shivaji University. Later, he was promoted as Research Director there.
प्रा. स.शं. देसाई यांचा जन्म बाळ्ळी येथे झाला. शिक्षण मराठीतून. प्राथमिक शिक्षण बाळ्ळी व पाळोळे, लिसेव (पोर्तुगीज) मडगांव व पणजी येथे. लहानपणापासून वाचनाची आवड. जडणघडणीच्या काळात मराठी, पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्रजी साहित्याचे भरपूर वाचन केले. १९४० साली पहिली कथा ‘आयुष्याचा वसंत’ कला मासिकात प्रसिद्ध झाली.
१९४४ साली पत्रकार होण्यासाठी पुण्याला प्रयाण. तेथे दै. लोकशक्ती, दै. समाचार, प्रभात, संयुक्त महाराष्ट्र इ. दैनिकात उपसंपादक म्हणून काम केले.
१९५७ मध्ये पत्रकारिता सोडून पं. महादेवशास्त्रींच्या ‘भारतीय संस्कृती कोश’ मंडळात साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या ‘भारतीय संस्कृती कोश’ मंडळात संशोधक साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. पुढे पदोन्नती मिळून विश्वकोशात संशोधक म्हणून काम पाहिले.
१९६४ च्या डिसेंबर महिन्यात शिवाजी विद्यापीठात इतिहास विभागात संशोधक सहकारी म्हणून निवड झाली. पुढे तिथेच संशोधक संचालक म्हणून पदोन्नती मिळाली.