Physical Geography (प्राकृतिक भूगोल)

· Chandrabhan Bhanudas Chaudhari Plot No-21, Borawake Nagar, Ward No-1, Shrirampur-413709 (MS, INDIA)
4,7
13 ulasan
eBook
259
Halaman

Tentang eBook ini

‘भूगोलशास्त्र (Geography)’ हा शास्त्रांची जननी किंवा शास्त्रांचे शास्त्र म्हणून ओळख असलेला, निसर्ग-मानव संबंध अभ्यासणारा, पर्यावरण संतुलनास दिशा देणारा, सर्वसमावेशक व बहुव्यापी विषय आहे. या विषयाचा मुख्य आधार ‘प्राकृतिक भूगोल (Physical Geography)’ हा आहे. ‘प्राकृतिक भूगोल’ प्रकृतीचा म्हणजेच निसर्गाचा अभ्यास करणारा मुलभूत विषय आहे. त्याच्या अभ्यासाशिवाय भूगोलाशास्त्रास अर्थ व गती प्राप्त होऊ शकत नाही, कोणत्याही घटकाची ओळख करून देता येत नाही, तसेच मानवाचे चिरंतन अस्तित्व व विकास साध्य करणेही अशक्य आहे.

‘प्राकृतिक भूगोल’ हा विषय संपूर्ण जगात विविध स्तरांवर अभ्यासला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये त्यास महत्व दिलेले आढळते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्येही पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पृथ्वीचे स्वरूप समजावे, नैसर्गिक संकल्पनांचा बोध व्हावा व भूगोलाशास्त्राचा विकास व्हावा या हेतूने ‘प्राकृतिक भूगोल’  हा विषय समाविष्ट केला गेलेला आहे.

प्रस्तुत ‘प्राकृतिक भूगोल’ हे मराठी माध्यमातील पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांच्या प्रथम वर्ष कला वर्गाच्या प्रथम सत्राच्या भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमास अनुसरून लिहिलेलं आहे. या पुस्तकात बहुतांशी संकल्पना रंगीत छायाचित्र व आकृती स्वरुपात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ‘प्राकृतिक भूगोल’ हा विषय समजण्यास मदत होईल असे वाटते. 

प्रस्तुत पुस्तकासाठी जे-जे संदर्भ साहित्य मला उपयुक्त ठरले त्या सर्व ज्ञानसागरांचा मी शतशः ऋणी आहे. आपल्या या भूगोलशास्त्रातील अनमोल कार्यामुळेच भूगोलशास्त्राचे भविष्य उज्ज्वल आहे.

धन्यवाद!!!!   


Rating dan ulasan

4,7
13 ulasan

Tentang pengarang

Associate Professor of Geography,

Department of Geography, SSGM College, Kopargaon

Dist. Ahmadnagar, State-Maharashtra, INDIA

Beri rating eBook ini

Sampaikan pendapat Anda.

Informasi bacaan

Smartphone dan tablet
Instal aplikasi Google Play Buku untuk Android dan iPad/iPhone. Aplikasi akan disinkronkan secara otomatis dengan akun Anda dan dapat diakses secara online maupun offline di mana saja.
Laptop dan komputer
Anda dapat mendengarkan buku audio yang dibeli di Google Play menggunakan browser web komputer.
eReader dan perangkat lainnya
Untuk membaca di perangkat e-ink seperti Kobo eReaders, Anda perlu mendownload file dan mentransfernya ke perangkat Anda. Ikuti petunjuk Pusat bantuan yang mendetail untuk mentransfer file ke eReaders yang didukung.