Nishikant, enveloped in pride; ‘Bhairavi’ - introduces him to real art. The wrath of Yallubai…for love…’Jatantun’ ‘Renuka’ – seeking to break free. ‘Mini’ – getting ‘Out’ for her mother and her home, despite the threshold that binds her. ‘Sarala’ – who has become just a ‘fill in the blank’ in her parental as well as her in-law’s home – ‘Rikami jaga’ ‘Sudhatai’ – who performs all the rites for her absconding husband who has left her destitute.‘Akka’ – who braves her pitiless Fate – ‘Gharachi chauthi bhint’ All these women who loved Life with passion despite being mere playthings of fate, in a way, mirror the writer’s mind. The reflection we see in this mirror acts like a balm to our tired minds.
अहंकारानं वेढलेल्या निशिकांतला खऱ्या कलेची ओळख करून देणारी – ‘भैरवी’ प्रेमासाठी यल्लूबाईचा कोप... ‘जटांपासून’ मुक्त होऊ पाहणारी – ‘रेणुका’आईसाठी, घरासाठी... घराच्या रेषेवर घट्ट पाऊल जखडूनही ‘आऊट’ होणारी – ‘मिनी’माहेर आणि सासरचीही फक्त एक ‘रिकामी जागा’ भरून काढण्याचं साधन बनलेली – ‘सरला’ परागंदा झालेल्या पतीमुळे बेवारशी झालेल्या... तरीही पतीचं सारं ‘तर्पण’ पार पाडणाऱ्या – ‘सुधाताई’काळ्या कातळ्यासारख्या नियतीसमोर हार न मानताना ‘घराची चौथी भिंत’ उभी करणाऱ्या ‘आक्का’ नियतीच्या या अगाध खेळातही जीवनावर निस्सीम प्रेम करणाऱ्या या स्त्रिया म्हणजे, जणू लेखिकेच्या मनाचा आरसाच..यात उमटलेलं प्रत्येक प्रतिबिंब...आपल्या श्रांत मनाला दिलासा देऊन जातं!