‘मी-लाय्’ या क्वांग अंगै (व्हिएतनाम) जवळच्या खेड्यामध्ये 16 मार्च, 1969 च्या सकाळी जे काही घडलं त्यावर आधारलेली ही कहाणी आहे.‘उद्ध्वस्त’मधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली आपल्याला भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागल्या-बोलल्या असत्या,तशाच त्या आहेत. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्फित यांचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वसनीय वाटावा असा विदारक आणि हृदयभेदक अध्याय, चित्तवेधक आणि नाट्यफूर्ण रीतीने मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.