1990 मध्ये, ह्यापुस्तकाच्यालेखकाने त्याच्या हितचिंतकांच्यासांगण्यावरून स्वतः मूत्रचिकित्सा केली होती. त्यांनाओटिओआर्थरायटिस झाला होता. त्यांची पत्नी दौपति भुरानी देखीलमूत्र चिकित्सेच्या सहाय्याने मज्जासंस्थेच्या गंभीर रोगामधून बाहेर आली. लेखक आणि त्यांची पत्नी,1993 मध्ये गोवामध्ये आयोजित प्रथम "ऑल इंडिया कॉन्फरन्सऑफ यूरीन थेरेपी" मध्ये सहभागी झाले होते. त्यानंतरमूत्र चिकित्सेचे लाभ प्राप्त करण्यासाठी संशोधन केले आणि योग्य पद्धत शोधली. इथूनच एका मिशनचा प्रारंभ झाला. हेमिशन आहेसमाज सेवा करून त्या लोकांना मूत्र चिकित्सेबद्दल विनाशुल्क माहिती देऊन जागरूक करणे जे विभिन्न प्रकारच्यागंभीर आजारांनी ग्रस्त आहेत."डॉ. बल्लाळ यांचे आयुर केअर क्लिनिक, मल्लेश्वरम, बंगळूर" मधीलडॉ.के. सी. बल्लाळ अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या त्यांच्या रुग्णांना ह्या पुस्तकाच्या लेखकाकडे पाठवण्यास सुरवात केली, जेणेकरून त्यांना ह्या उपचाराचा लाभ घेता येईल. ह्यामिशनला यशस्वी करण्यासाठी लेखकाने अनेक विभागांना व संस्थांना पत्रे लिहिली आहेत. तसेच पत्रांसोबत पुस्तकांच्या प्रति देखील पाठवल्या आहेत. हे विभाग आहेत - राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व विभाग,भारतीयचिकित्सा आणिसंशोधन परिषद,दिल्ली, केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय, इत्यादी. या व्यतिरिक्त त्यांनी भारताचे राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, प्रधानमंत्री, कर्नाटकचे राज्यपाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना देखील पत्रे लिहिली आहेत आणि ह्या बाबतीतनैतिक समर्थन देण्याची विनंती केली आहे. संपूर्ण जगातील लोकांना मदत करण्यासाठी श्री भुरानी यांनी केलेले हे कार्य मनुष्यजाती साठी केलेले एक महान कार्य आहे.