Wear OS वरील Google Gemini - तुमच्या मनगटावरील उपयुक्त AI असिस्टंट
Wear OS वरील Gemini हा तुमच्या वॉचवरील आमचा खरोखर उपयुक्त AI असिस्टंट आहे. फिरतीवर असतानाही जास्तीत जास्त कामे करवून घेण्यासाठी फक्त साध्यासोप्या भाषेत बोला. Gemini अनेक अॅप्सवरील टास्क हाताळू शकते, प्रश्नांना उत्तरे देऊ शकते आणि तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण तपशील लक्षात ठेवू शकते.
Gemini ला पुढील गोष्टी करण्यास सांगून पहा:
कनेक्टेड राहणे: “मला उशीर होतो आहे याबद्दल नम्रताला सॉरी बोलणारा मेसेज पाठव”
माहिती मिळवणे: “इम्तियाजने आज रात्रीच्या डिनरसाठी ईमेल केला होता, त्यातले रेस्टॉरंट कुठे आहे?”
संगीत नियंत्रण: “मला ६ किमी जॉगिंगला जायचे आहे, त्यासाठी एक ३० मिनिटांची प्लेलिस्ट तयार कर”
तपशील लक्षात ठेवणे: “मी लेव्हल P2 ला ४०३ स्पॉटवर कार पार्क केली आहे, लक्षात ठेव”
Gemini अॅप निवडक डिव्हाइस, भाषा आणि देशांमध्ये उपलब्ध आहे. कंपॅटिबल डिव्हाइसशी कनेक्ट केलेले राहण्यासाठी कंपॅटिबल Wear OS वॉच आवश्यक आहे. अचूकतेसाठी प्रतिसाद तपासा. इंटरनेट कनेक्शन आणि सेट अप आवश्यक असू शकते. परिणाम हे इलस्ट्रेशन उद्देशांसाठी आहेत आणि ते वेगवेगळे असू शकतात.
जबाबदारीने आशय तयार करणे:
https://policies.google.com/terms/generative-ai/use-policy
सपोर्ट असलेल्या भाषा आणि देशांची संपूर्ण सूची येथे पहा:
https://support.google.com/?p=gemini_app_requirements_android
तुम्ही Gemini अॅपची निवड केल्यास, ते तुमच्या वॉचवरील प्राथमिक असिस्टंट म्हणून Google Assistant ची जागा घेईल. काही Google Assistant ची आवाज वैशिष्ट्ये अद्याप Gemini ॲपद्वारे उपलब्ध नाहीत. तुम्ही सेटिंग्जमध्ये Google Assistant वर परत स्विच करू शकता.
या रोजी अपडेट केले
५ जाने, २०२६