Android Accessibility Suite हा न डोळ्यांचा वापर न करता किंवा स्विच डिव्हाइस वापरून तुम्हाला तुमचे Android डिव्हाइस वापरण्यात मदत करणाऱ्या अॅक्सेसिबिलिटी ॲप्सचा संग्रह आहे.
Android Accessibility Suite मध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो:
• अॅक्सेसिबिलिटी मेनू: तुमचा फोन लॉक करण्यासाठी, व्हॉल्यूम आणि ब्राइटनेस नियंत्रित करण्यासाठी, स्क्रीनशॉट घेण्यासाठी व आणखी बरेच काही करण्यासाठी स्क्रीनवरील या मोठ्या मेनूचा वापर करा.
• बोलण्यासाठी निवडा: तुमच्या स्क्रीनवरील आयटमना मोठ्याने ऐकण्यासाठी ते निवडा.
• TalkBack स्क्रीन रीडर: वाचिक फीडबॅक मिळवा, जेश्चर वापरून तुमचे डिव्हाइस नियंत्रित करा आणि स्क्रीनवरील ब्रेल कीबोर्ड वापरून टाइप करा.
सुरुवात करण्यासाठी:
१. तुमच्या डिव्हाइसचे सेटिंग्ज अॅप उघडा.
२. अॅक्सेसिबिलिटी निवडा.
३. अॅक्सेसिबिलिटी मेनू, बोलण्यासाठी निवडा, स्विच अॅक्सेस किंवा TalkBack निवडा.
परवानग्यांची नोटिस
• फोन: तुमच्या कॉल स्टेटसशी घोषणा जुळवून घेण्यासाठी Android Accessibility Suite हे फोनच्या स्थितीचे निरीक्षण करते.
• अॅक्सेसिबिलिटी सेवा: हे अॅप एक अॅक्सेसिबिलिटी सेवा असल्यामुळे ते तुमच्या कृती पाहू शकते, विंडोचा आशय मिळवू शकते आणि तुम्ही टाइप करत असलेला मजकूर पाहू शकते.
• नोटिफिकेशन: तुम्ही ही परवानगी दिल्यावर, TalkBack तुम्हाला अपडेटबद्दल सूचित करू शकते.
या रोजी अपडेट केले
३० सप्टें, २०२५